GPS Toll : भारतात आता GPS वर आधारीत टोल आकारणी, GPS टोल म्हणजे काय ? जाणून घ्या......

GPS Toll : भारतात आता GPS वर आधारीत टोल आकारणी, GPS टोल म्हणजे काय ? जाणून घ्या...... 

GPS Toll : भारतात आता GPS वर आधारीत टोल आकारणी, GPS टोल म्हणजे काय ? जाणून घ्या...... GPS Toll : भारतात आता GPS वर आधारीत टोल आकारणी, GPS टोल म्हणजे काय ? जाणून घ्या......
GPS Toll : भारतात आता GPS वर आधारीत टोल आकारणी । छायाचित्र स्रोत गुगल इमेजेस 

GPS Based Toll Collection : देशात आता जीपीएस आधारीत टोल वसुली सुरू करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. जाणून घ्या ही जीपीएस आधारीत टोल वसुली आणि तिचे फायदे...

GPS Based Toll Collection : टोलच्या रांगेतून वाहनांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग लागू केला होता. आता फास्टॅगही संपुष्टात येणार असल्याची शक्यता असून जीपीएस आधारे टोल वसुली होणार आहे. सॅटेलाइट नेव्हिगेशन टोलिंग सिस्टिम ही नवी यंत्रणा लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं चाचण्या सुरु केल्या आहेत. त्यात देशभरातील 1 लाखांहून अधिक वाहनांचा समावेश आहे. जीपीएस आधारीत टोल वसुली कशी होणार, कोणत्या देशात हा प्रयोग झालाय, जाणून घेऊयात 

जीपीएस आधारीत टोल वसुली म्हणजे काय?

सध्या बहुतांशी नव्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा असते. संबंधित वाहनाने प्रवास केलेल्या मार्गावरून टोल वसूल केला जाणार. टोलची रक्कम ही वाहनधारकाच्या बँक खात्यातून अथवा ई-वॉलेटमधून कापण्यात येईल. ज्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा नसणार, अशा वाहनांसाठी जीपीएस लावण्यासाठी सरकार निर्णय घेणार असल्याचे याआधी परिवहन, रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. 


कोणत्या देशात GNSSचा वापर?

Global Navigation Satellite System (GNSS) चा वापर करून काही देशांमध्ये टोल आकारणी केली जाते. युरोपमधील काही देशांमध्ये 3.5 टन वजनापेक्षा अधिक वाहनांकडून टोल आकारणी केली जाते. यामध्ये जर्मनी, स्लोव्हाकिया, हंगेरी, बेल्जियम, रशिया, चेक प्रजासत्ताक, बल्गेरिया आदी देशांमध्ये ही GNSS चा वापर करून  टोल आकारला जातो. पोलंडनेदेखील मागील वर्षी GNSS आधारीत टोल वसूल करण्याचा निर्णय घेतला. 


जीपीएस आधारीत टोलचा काय फायदा ?

जीपीएस आधारीत टोल वसुली सुरू झाल्यास टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल असा दावा करण्यात येतो. टोल नाकेही हटवण्यात येतील. थेट टोल वसुली होणार असल्याने वाहने वाहतूक कोंडीत अडकणार नाहीत. 


वेळ आणि इंधनाची बचत -

जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभरातील टोलनाक्यांवरील कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. वाहतूक कोंडी न झाल्याने इंधनाची बचत होईल. त्याशिवाय प्रवासाला कमी वेळ लागेल. 


◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. 

__________________________

 Read the latest Marathi newsBreaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile. 
__________________________

 News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,
__________________________

(अस्वीकरण - हि बातमी मराठी संपादकने संपादित केलेली नाही, इंटरनेट वर प्रदर्शित होत असलेल्या बातम्यांमधून हि बातमी प्रकाशित करण्यात आली आहे, यात प्रकाशित करण्यात आलेली माहिती,फोटो,आणि इतर लिंक याची जबाबदारी मराठी संपादक घेत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

टिप्पण्या