एकीकडे पाणीबाणी, दुसरीकडे पाण्याची नासाडी.धुळे मनपाचा भोंगळ कारभार
धुळे - एकीकडे धुळे शहर वासियांना पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे मुंबई-आग्रा महामार्गावरील नगांव गावाजवळील उड्डापुलाच्या खाली असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला गेल्या काही दिवसांपासून गळती लागलीय. ही गळती एवढया मोठया प्रमाणात आहे की या परिसराला कालव्याचे स्वरूप आलंय. हे पाणी दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहत आहे.
हे वाहत पाणी नगांव प्राथमिक आरोग्य केंद्र च्या प्रवेशद्वार पर्यंत वाहत असल्यानं परिसरात चिखल, दलदल निर्माण झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे.जनतेबद्दल कळवळा दाखवणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष याची दखल घेतली का?असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय.
धुळे महानगर पालिकेत भाजपची सत्ता आल्यास धुळे महानगरवासीयांना दररोज पाणी देऊ असा शब्द दिलेल्या भाजपने हा शब्द सत्ता आल्यानंतर किती पाळला हे धुळे शहर वासिय याची देही, याची डोळा अनुभवत आहे.
पंधरा दिवसातून धुळे शहरवासीयांना पाणीपुरवठा होत आहे.(पाणीपट्टी मात्र पूर्ण तीनशे पासष्ठ दिवसांची हा कुठला नियम, हा कुठला कायदा )तरी या बद्दल भाजप ला जराही खंत नाही. इतरवेळी मतदारांबद्दल कळवळा दाखवणारे नगरसेवक देखील याबाबद्दल चकार शब्द काढत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
एकीकडे धुळे शहर वासियांना पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे मुंबई-आग्रा महामार्गावरील नगांव गावाजवळील उड्डापुलाच्या खाली असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला गेल्या काही दिवसांपासून गळती लागलीय. ही गळती एवढया मोठया प्रमाणात आहे की या परिसराला कालव्याचे स स्वरूप आलंय. हे पाणी दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहत आहे. हे वाहत पाणी नगांव प्राथमिक आरोग्य केंद्र च्या प्रवेशद्वार पर्यंत वाहत असल्यानं परिसरात चिखल, दलदल निर्माण झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे.जनतेबद्दल कळवळा दाखवणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष याची दखल घेतली का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय.
महानगर पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी धुळे शहर वासीयांच्या सहन शक्तीचा अंत पाहू नये.शहराला दररोज पाणीपुरवठा करावा, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा नागरिकांनी महानगर पालिकेला दिला आहे.
◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
__________________________
Read the latest Marathi news, Breaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile.
__________________________
News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,
__________________________

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा