तासनतास पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा हिंगोलीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला पर्दाफाश...

तासनतास पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा हिंगोलीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला पर्दाफाश...

Image Source - Google Images | Image Credit - TV9Marathi
 
मार्च एन्डला चुलीवरचा बाबा चर्चेत होता, जो बाबा तापत्या तव्यावर बसून भक्तांच्या समस्या ऐकायचा. 1 एप्रिलला महाराष्ट्रातल्या कालीचरण बाबानं महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन करुन गोडसेला दंडवत घातलं. 2 एप्रिलला बागेश्वर बाबानं गिधड आणि शेरचं उदाहरण देत अप्रत्यक्षपणे साईबाबा हिंदू होते की मुस्लिम या वादावर बोट ठेवलं. आणि आता हिंगोलीतला पाण्यावरचा बाबा समोर आलाय.

मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली तालुक्यातील धोत्रा गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहासाठी ग्रामस्थांनी ह.भ.प हरिभाऊ महाराज दुर्गसावंगीकर यांना यंदा कीर्तनासाठी बोलावलं. हे बाबा रोज कीर्तनानंतर विहिरीत जाऊन पाण्यावर तरंगण्याचे प्रयोग दाखवितात. कीर्तनापेक्षा जास्त गर्दी यालाच होत असून लोक दाटीवाटीने विहिरीवर जमताना दिसत आहेत.

धोत्रा येथे सुरू असलेल्या या सप्ताहाची ६ एप्रिलला सांगता आहे. हरिभाऊ महाराज व त्यांची पत्नी सुमनबाई ज्ञानेश्वरीचे पारायण करायला आले आहेत. मात्र हरिभाऊ रोज शेत शिवारात जाऊन विहिरीतील पाण्यावर तरंगून मंत्रोच्चार करतात. तर बाबा पाण्यावर बारा-बारा तास तरंगत असतात, असे भक्त सांगत आहेत.

 वाचन करणाऱ्या बाबांनीच आपण दैवीकृपेनं पाण्यावर तरंगण्याचा दावा केला. 14 महिने उपवास, ब्रह्मचर्य, मनशुद्धी आणि नामस्मरणामुळेच आपण आणि त्यांची पत्नीही पाण्यात तरंगू शकते, असं बाबा हरिभाऊ राठोडांचं म्हणणंय.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचा अभ्यास केल्याने सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा करत तासनतास पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा हिंगोलीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सकाळीच पाण्यावर तरंगणारा बाबा राहत असलेल्या धोत्रा गावामध्ये पोहोचले. या बाबासोबत चर्चा केल्यानंतर अंनिस कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांनी धोत्रा शिवारातील विहीर गाठली आणि या विहिरीमध्ये सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा करणारे हरी महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी प्रकाश मगरे या दोघांनीही विहिरीत उड्या टाकल्या.

विहिरीमध्ये महाराजांप्रमाणेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी देखील पाण्यावर तरंगत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र नेहमीचा सराव नसल्याने या बाबासारखे जास्त वेळ ते पाण्यावर तरंगू शकले नाही. यानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या या बाबाने सिद्धी प्राप्त झाल्याच्या दाव्यावरून घुमजाव केले, पोलीस अधिकाऱ्यांनी देखील हा चमत्कार नसून सराव केल्याने कुणालाही पाण्यांवर तरंगता येणं शक्य आहे, असं सांगितलं. त्यामुळे या बाबाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधिकारी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

कुठलाही धर्म किंवा कुठलाही समाज असो त्या समाजातील त्या धर्मातील व्यक्तीला आपापल्या देवदेवतांबद्दल आदर असतो, तो असणे स्वाभाविक देखील आहे. परंतु काही लोक अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वतःचं उखळ पांढरे करून घेतायेत. अचानक एखादा महाराज एखाद्या गरम तव्यावर मंत्र जप करतो, तर कोणी पाण्यावर तरंगत असतो. अशावेळी देव पावन झाला असे सांगून ही मंडळी समाजातील लोकांना लुटत आहे. असाच काहीसा प्रकार हिंगोली जिल्ह्यात घडला आणि आता चर्चा फक्त पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची ऐकायला मिळते आहे.

◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. 

__________________________

 Read the latest Marathi newsBreaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile. 
__________________________

 News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,
__________________________

(अस्वीकरण - हि बातमी मराठी संपादकने संपादित केलेली नाही, इंटरनेट वर प्रदर्शित होत असलेल्या बातम्यांमधून हि बातमी प्रकाशित करण्यात आली आहे, यात प्रकाशित करण्यात आलेली माहिती,फोटो,आणि इतर लिंक याची जबाबदारी मराठी संपादक घेत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

टिप्पण्या