आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाला नागरिकरांचे खरमरीत पत्र.

धुळे शहरातील देवपूर भागातील काही जागरूक नागरिकांचं महानगर पालिकेला पत्र...


प्रति, 
मा.महापौर / मा.आयुक्त 
धुळे मनपा धुळे .

विषय:-  आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याबाबत..

धुळे शहराच्या देवपूर दत्तमंदिर परिसरातील संतसेना, ग द माळी सोसायटी, भोई सोसायटी भागातील वसाहतींना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.अक्कलपाडा योजना पूर्ण होईल तेव्हा होईल आत्ताच काय?देवपूर भागाला पाणीपुरवठा संदर्भात पर्यायी व्यवस्था काय?तापी योजना तांत्रिक कारणामुळे बंद झाल्यास देवपूर भागाला पर्यायी व्यवस्था काय?सध्या तर  महापौर,उपमहापौर ही दोन्ही पद देवपूर भागाला प्रथमच मिळाली आहेत.महापौर, उपमहापौर यांनी तरी आपण ज्या भागात राहतो त्या भागात पाणीपुरवठा, आरोग्य या किमान मूलभूत सुविधा नियमित मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, मात्र तसे होतांना दिसत नाही.देवपूर भागातील पाणीपुरवठा नियमीत होण्यात व्यत्यय आणणारा झारीतील शुक्राचार्य कोण ?याचा देखील शोध मनपाने घ्यायला हवा.दोन दिवसावर अक्षयतृतीयेचा सण आहे .किमान त्या आधी तरी देवपूरवासियांना पाणी मिळेल ही अपेक्षा.

-कळावे.

आपले विश्वासू.
समस्त देवपूर दत्तमंदिर परिसरातील संतसेना, ग द माळी सोसायटी, भोई सोसायटी भागातील रहिवाशी.

◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. 

__________________________

 Read the latest Marathi newsBreaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile. 
__________________________

 News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,
__________________________

(अस्वीकरण - हि बातमी मराठी संपादकने संपादित केलेली नाही, इंटरनेट वर प्रदर्शित होत असलेल्या बातम्यांमधून हि बातमी प्रकाशित करण्यात आली आहे, यात प्रकाशित करण्यात आलेली माहिती,फोटो,आणि इतर लिंक याची जबाबदारी मराठी संपादक घेत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

टिप्पण्या