Video : पुरस्कार मिळाल्यानंतर रितेश देशमुख जिनिलीयाच्या पडला पाया !!

Video : पुरस्कार मिळाल्यानंतर रितेश देशमुख जिनिलीयाच्या पडला पाया !!

Screenshot of instagram video


बॉलिवूडमध्ये कायमच ट्रेंडीग मध्ये असणारे कपल म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलीयाकडे पाहिले जाते. ते दोघेही कायमच चर्चेत असतात. रितेश आणि जिनिलीया यांच्या लग्नाला १० वर्षे उलटली आहेत. पण त्यांच्यातील प्रेम हे अद्याप कायम आहे. नुकतंच एका कार्यक्रमात रितेश जिनिलीयाच्या पाया पडला आणि त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
रितेश आणि जिनिलीया नुकतंच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. झी मराठीने त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश हा त्याच्या सुखी संसाराचे गुपित सांगताना दिसत आहे. यावेळी श्रेयस तळपदे आणि रितेशची ऑनस्क्रीन सुरु असलेली मजा मस्तीही पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला श्रेयस तळपदे हा रितेशला तुझ्या “सुखी संसाराचे रहस्य काय?” असा प्रश्न विचारतो. त्यावर रितेश हा माणसाने चूक आपलीच आहे, हे लवकर कबूल केलं पाहिजे, असे म्हणतो. रितेशचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेल्या अभिनेत्री अलका कुबल या हसताना दिसतात.
त्यानंतर रितेशचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर रितेशा हा भर पुरस्कार सोहळ्यात जिनिलीयाच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यानंतर तिथे उपस्थित सर्वजण ‘वेड’ या चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. ‘रितेश देशमुख हे त्यांच्या पत्नीला घाबरतात’, असे श्रेयस यावेळी बोलतो. त्यावरही सर्वजण खळखळून हसताना दिसत आहेत.
दरम्यान रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.

 ◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. 

__________________________

 Read the latest Marathi newsBreaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile. 
__________________________

 News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,
__________________________

(अस्वीकरण - हि बातमी मराठी संपादकने संपादित केलेली नाही, इंटरनेट वर प्रदर्शित होत असलेल्या बातम्यांमधून हि बातमी प्रकाशित करण्यात आली आहे, यात प्रकाशित करण्यात आलेली माहिती,फोटो,आणि इतर लिंक याची जबाबदारी मराठी संपादक घेत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

टिप्पण्या