सर्वोपचार रुग्णालयात ३० मार्चपासून थायरॉईड रुग्णांसाठी ओपीडी सुरु

सर्वोपचार रुग्णालयात ३० मार्चपासून थायरॉईड रुग्णांसाठी ओपीडी सुरु

प्रीतिकात्मक चित्र


  धुळे :- थायरॉईड मिशन अंतर्गत सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे थायरॉईड रुग्णांसाठी ओपीडी औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या ओपीडी क्रमांक तीनमध्ये सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

  थायरॉइड मिशन अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना थायरॉईड आजाराविषयी मार्गदर्शन, रुग्णांच्या थायरॉईडच्या तपासण्या, त्यावरील औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील. ही ओपीडी 30 मार्च, 2023 रोजी पासून प्रत्येक गुरुवारी दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत सुरु ठेवण्यात येईल. असेही  मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे

टिप्पण्या