Dhule News - धुळे गारठलं,तापमान ५ अंश सेल्सिअस....

Dhule News - धुळे गारठलं,तापमान ५ अंश सेल्सिअस....

Image Source - Google


महिनाभराच्या विश्रांती नंतर थंडी पुन्हा परतली ,धुळे गारठलं,तापमान ५ अंश सेल्सिअस.

धुळे :- महिनाभरानंतर  धुळ्यात थंडीचा जोर पुन्हा वाढलाय.सोमवारी धुळ्यात कडाक्याची थंडी होती.दोन-चार दिवस ढगाळ हवामान होतं. सोमवारी आकाश निरभ्र होतं. त्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढला.सोमवारी सकाळी धुळ्यात ५ अंश सेल्सिअस.  धुळ्यात यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद झालीय.चार दिवसांत तापमान ६ अंशाने खाली घसरल.




धुळ्यातील चार दिवसाच्या तापमानावर एक दृष्टिक्षेप :-

(१) शुक्रवार, ६ जानेवारी  या दिवशी ११ अंश सेल्सिअस.

(२) शनिवार, ७ जानेवारी या दिवशी ११.५ अंश सेल्सिअस.

(३) रविवार, ८ जानेवारी या दिवशी ८.६ अंश सेल्सिअस.

(४) सोमवार, ९ जानेवारी या दिवशी ५ अंश सेल्सिअस.

तर महिनाभरापूर्वी म्हणजे १० डिसेंबर या दिवशी तापमान ५.५ अंश सेल्सिअस होत.महिनाभरानंतर  धुळ्यात थंडीचा जोर पुन्हा वाढलाय.


 चार दिवसांत तापमान ६ अंश सेल्सिअस ने खाली घसरले. थंडीचा कडाका रब्बी पिकांसाठी फायदेशीर असल्याचं कृषी क्षेत्रातील जाणकार सांगतात.मात्र थंडी बरोबर पहाटेच्या वेळी पडणारं धुके, आणि कधी निरभ्र तर कधी ढगाळ हवामान याचा मात्र रब्बी पिकांवर परिणाम होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची थंडीत काळजी घ्यावी, गुरांच्या थोड्यात उबदार वातावरण राहण्यासाठी पुरेश्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलंय.  थंडीत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, गरम, उबदार कपडे परिधान करावे असं आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केलंय.सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी याचा त्रास होऊ शकतो, तसेच सांधेदुखी, हृदयरोग असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी  असं आवाहन देखील वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केलंय

 थंडीचे वाढते प्रमाण पाहता सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा सकाळी ९ वाजता भराव्यात अशी मागणी युवा सेनेनं गेल्याच आठवड्यात शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलीय.थंडीमुळे लहान मुलांना त्रास होतो,जेवढं शिक्षण महत्वाचं तवढंच आरोग्य देखील महत्वाचं हे लक्षात घेऊन शिक्षणाधिकारी यांनी निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी युवा सेनेनं केलीय.

दरम्यान,  वाढती थंडी व्यायाम प्रेमीं साठी पर्वणीच ठरल्याने व्यायाम करणाऱ्यांचा उत्साह अधिक वाढलाय. तर दुसरीकडे बाजारात गरम कपड्यांच्या मागणीत वाढ झालीय.

टिप्पण्या