लग्नाच्या वऱ्हाडाची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसला अपघात, २ वृद्ध महिलांसह २ लहान मुली गंभीर जखमी...
धुळे :- स्कुल बस मधून वऱ्हाडाची वाहतूक होत असतांना ही स्कूल बस धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी - मालेगांव मार्गावरील भडगांव बारी येथील वळणावर उलटली. प्रत्यक्ष दर्शीच्या म्हणण्यानुसार हा अपघात शुक्रवारी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान घडला.चिकसे कडून साक्रीच्या दिशेनं ही स्कूल बस वऱ्हाडाला घेऊन जात होती. या स्कूल बस मध्ये ३५ ते ४० वऱ्हाडी होते, यात महिला ,लहान मुलांचा समावेश होता. दोन वयस्कर महिला तसेच ९ ते १० वर्ष वयाच्या दोन मुली या अपघातात गंभीर जखमी झालेत. जखमींना मालेगांव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अशी माहिती पोलिसांनी दिलीय . विद्यार्थी वाहतुकीसाठी असलेल्या बसचा लग्नाच्या वऱ्हाड वाहतुकीसाठी वापर झाल्यानं वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत असल्यानं आता विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणाऱ्या संस्था चालकावर आरटीओ, पोलीस कारवाई होणार का ? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. दरम्यान, भडगांव बारी येथील वळण हे अपघाती क्षेत्र ठरू पाहत आहे . याठिकाणी यापूर्वी देखील अपघात झाले आहेत . संबंधित विभागानं या ठिकाणी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा