विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी शनिवार, रविवारी महावितरणच्या परिमंडल कार्यालयांत होणार

विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी   शनिवार, रविवारी महावितरणच्या परिमंडल कार्यालयांत होणार

फोटो - पोलिसनामा

__________________________


धुळे :- मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रसिद्ध केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी परिमंडलनिहाय २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.

    महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.




    परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये २९ तसेच ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वत: उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.

◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. 

__________________________

 Read the latest Marathi newsBreaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile. 
__________________________

 News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,

टिप्पण्या