व्हिडिओ | धुळ्यात फटाक्यामुळे एकाच दिवशी आगीच्या तीन घटना, सुदैवानं कोणीही जखमी नाही
![]() |
| एकाच दिवशी धुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात आगीच्या घडलेल्या घटना या फटाक्यामुळेच झाल्याचं स्थानिक नागरिक तसेच अग्निशमन विभागानं सांगितलं |
__________________________
__________________________
धुळे :- बुधवार हा धुळ्यासाठी "अग्नी" वार ठरला. या एकाच दिवशी धुळे शहराच्या विविध भागात फटाक्यामुळे आगीच्या तीन घटना घडल्यात. सुदैवानं यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. या घटनांची गुरुवारी सकाळ पर्यंत पोलिसांत नोंद नव्हती.
__________________________
__________________________
या ठिकाणी आगीचं रौद्र रूप :- धुळे महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहरातील पारोळा रोड वरील प्रकाश टॉकीज जवळ असलेल्या गांधी नगर भागातील एका प्लॅस्टिक पाण्याच्या टाकी विक्रेत्याच्या दुकान कम गोदाम असलेल्या ठिकाणी बुधवारी रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास आग लागली. या ठिकाणी कोळसा , लाकडं आणि प्लॅस्टिक च्या वस्तू असल्यानं काही क्षणात आगीनं रौद्र रूप घेतलं. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अवघ्या अर्ध्या तासात सहा अग्निशमन च्या बंबाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेड ला यश आलं ही आग आटोक्यात आणण्यासाठी धुळे महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागातील सहाय्यक अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन , अमोल सोनवणे, संतोष शिरसाठ , जितू सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतलेत. या आगी च्या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती सहाय्यक अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन यांनी दिली
__________________________
हे देखील वाचा । ठाण्यात लोकांना घाबरवण्यासाठी एका व्यक्तीने निवासी इमारतीवर सोडले रॉकेट, गुन्हा दाखल...
__________________________
अन्य ठिकाणीही आगीच्या घटना :- याच दिवशी धुळे शहराची मुख्य बाजार पेठ म्हणून ओळख असलेल्या , नेहमी गजबजलेला परिसर म्हणून ओळख असलेल्या फुलवाला चौकात देखील एका जुन्या घराला आग लागली . परिसरातील नागरिकांनी तत्परतेनं प्रथम मिळेल तेथून पाणी घेत पाण्याचा मारा केला तसेच घटनास्थळी अग्निशमन चा एक बंब तात्काळ दाखल झाल्यानं आगीवर देखील तात्काळ नियंत्रण मिळवण्यात नागरिकांना , अग्निशमन विभागाला यश आलं. या घटनेत देखील कोणीही जखमी झालं नसल्याचं सांगण्यात आलं. याच भागात अन्य एका ठिकाणी देखील आगीची घटना घडली मात्र याठिकाणी देखील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग तात्काळ आटोक्यात आली. अन्य एका घटनेत धुळे शहरातील जयहिंद कॉलनी परिसरात असलेल्या एका बिल्डींग परिसरात आगीची किरकोळ घटना घडली .
एकाच दिवशी धुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात आगीच्या घडलेल्या घटना या फटाक्यामुळेच झाल्याचं स्थानिक नागरिक तसेच अग्निशमन विभागानं सांगितलं . दरम्यान, गुरुवारी सकाळ पर्यंत या घटनांची पोलिसांत नोंद नव्हती.
धुळ्यात फटाक्यामुळे एकाच दिवशी आगीच्या तीन घटना, सुदैवानं कोणीही जखमी नाही https://t.co/SPPRLhrQ5n#dhule #maharashtranews #maharashtra #धुळे pic.twitter.com/4qVbYQCKA6
— Marathi Sampadak (@MSampadak) October 28, 2022
◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
__________________________
Read the latest Marathi news, Breaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile.
__________________________
News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा