पुणे : हडपसरमध्ये भीषण अपघात; 1 ठार, 3 गंभीर जखमी

पुणे : हडपसरमध्ये भीषण अपघात; 1 ठार, 3 गंभीर जखमी

Pune,city,Pune-News,Pradeshik,Hadapsar-Accident,
पुण्यातील हडपसर येथे मिक्सर कंटेनरने चार रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे


पुण्यातील हडपसर येथे चार रिक्षा आणि कारचा मिक्सर कंटेनरने भीषण अपघात केला, या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे

पुण्याच्या हडपसरमध्ये कंटेनरने चार रिक्षा आणि कार उडवली, 1 जण ठार तर तीन जण गंभीर जखमी. हा अपघात एवढा भीषण होता की कंटेनरच्या धडकेने झाड कोसळून एका नागरिकाच्या अंगावर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिक्सर कंटेनर हा सोलापूर रोडने हडपसर येथील गाडीतळाजवळ आला. त्यावेळी एक दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे असलेल्या ४ ते ५ रिक्षांना एका पाठोपाठ धडक दिली. एका कारला धडक दिल्यानंतर हा कंटेनर एका झाडाला धडकला. ही धडक इतकी जोरात होती की धडकेमुळे झाड कोसळले. कंटेनर उलटला. त्याखाली एक रिक्षा सापडून तिचा चक्काचूर झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला असून  इतर तिघे जखमी झाले आहेत.
Google Image

या अपघातात कंटेनरमधील क्लिनरचा मृत्यू झाला. तर तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मृत व जखमींची माहिती मिळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांना रिक्षातून बाहेर काढले. जखमींना ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून, नियमित वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन ते अडीच तास लागले.


अस्वीकरण - हि बातमी मराठी संपादकने संपादित केलेली नाही, गुगल न्यूज आणि इंटरनेट वर प्रदर्शित होत असलेल्या बातम्यांमधून हि बातमी प्रकाशित करण्यात आली आहे, यात प्रकाशित करण्यात आलेली माहिती,फोटो,आणि इतर लिंक याची जबाबदारी मराठी संपादक घेत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

टिप्पण्या