आणखी एक मोठा गौप्यस्फोट ; एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते...
![]() |
| File Photo |
हे देखील वाचा । पुणे : हडपसरमध्ये भीषण अपघात; 1 ठार, 3 गंभीर जखमी
शिवसेनेच्या १५ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असं चंद्रकांत खैरेंनी दावा केला आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या समावेत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते शक्य झालं नाही असं म्हटलं.
हे देखील वाचा | टीव्ही रिपोर्टर हवेत उडतो, तर कुठे रस्त्यावर शार्क येते: चक्रीवादळ इयान फ्लोरिडाला धडकले | व्हिडिओ पाहा
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण त्यांच्या एका वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. आता अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि एखनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येण्याची तयारी दर्शवली होती, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण बोलले. यावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा