राज्यातील तब्बल ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या...
हे देखील वाचा । ऑक्टोबर 2022 पासून नवीन नियम: 1 ऑक्टोबरपासून हे ११ नियम बदलणार आहेत, जाणून घ्या याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो ?
मुंबई : राज्य सरकारने गुरूवारी रात्री उशिरा राज्यातील तब्बल 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे राज्यातील अनेक विभागाचा कारभार बदलणार आहे. हे सर्व क्लास वन लेव्हलचे अधिकारी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त या दोघांचीही बदली करण्यात आली आहे.
हे देखील वाचा । आरोग्य कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, शिक्षक यांना दिवाळी निमित्त मुखमंत्र्यांकडून गिफ्ट...
पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची बदली राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची बदली राज्य उत्पादन शुल्क व विमान चालन प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांची बदली आदिवासी विभाग अपर मुख्य सचिव या पदावर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा । छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :-
- श्रीमती श्रद्धा जोशी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमडी)
- मनुज जिंदाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)
- सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी, उस्मानाबाद)
- अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)
- राजेश पाटील (संचालक, सैनिक कल्याण, पुणे.)
- श्रीमती आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)
- कीर्ती किरण एच पुजार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी)
- रोहन घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा)
- विकास मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद)
- श्रीमती वर्षा मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना)
- के.व्ही.जाधव (संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई)
- कौस्तुभ दिवेगावकर, (प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास प्रकल्प, पुणे)
- एम.देवेंद्र सिंग (जिल्हाधिकारी, रत्नागिरी)
- विवेक एल. भीमनवार (परिवहन आयुक्त)
- राजेंद्र निंबाळकर (व्यवस्थापकीय संचालक एमएसएसआयडीसी)
- डॉ. भगवंतराव नामदेव पाटील (महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका)
अस्वीकरण - हि बातमी मराठी संपादकने संपादित केलेली नाही, गुगल न्यूज आणि इंटरनेट वर प्रदर्शित होत असलेल्या बातम्यांमधून हि बातमी प्रकाशित करण्यात आली आहे, यात प्रकाशित करण्यात आलेली माहिती,फोटो,आणि इतर लिंक याची जबाबदारी मराठी संपादक घेत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा