कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत; पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत; पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध...

Ganesh-Festival,Ganesh,Ganpati-Utsov,Travelling,Toll-Tax-Free-For-Ganesh-Utsav,महाराष्ट्र, गणपती, गणपती-उत्सव,



गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई - बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि. ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

Ganesh-Festival,Ganesh,Ganpati-Utsov,Travelling,Toll-Tax-Free-For-Ganesh-Utsav,महाराष्ट्र, गणपती, गणपती-उत्सव,



दिनांक २७ ऑगस्ट ते दिनांक ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई - बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा. म. ६६) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.

Ganesh-Festival,Ganesh,Ganpati-Utsov,Travelling,Toll-Tax-Free-For-Ganesh-Utsav,महाराष्ट्र, गणपती, गणपती-उत्सव,



आमच्या सर्व ताज्या बातम्यांच्या अपडेट साठी आताच आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा ! 

 अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

टिप्पण्या