धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच येईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा....
राजकारण,धनुष्यबाण,एकनाथ-शिंदे,देवेंद्र-फडणवीस,उद्धव-ठाकरे,शिवसेना,
धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच येईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा .
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य.
शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करणार-- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हनुमान चालीसा म्हणण्यास आता कुठलीही बंदी नाही , ज्याला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तो हनुमान चालीसा म्हणू शकतो . त्यामुळे आता हनुमानाची गदा पूजा करण्यासाठी ठेवायची आहे , तिला कोणाच्या डोक्यावर चालवण्याची आवशकता नाही असा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं नांव न घेता लगावला . सत्कारावेळी देवेंद्र फडणवीस यांना चांदीचे धनुष्य बाण आमदार जयकुमार रावल यांच्या कुटुंबियांच्या वतीनं देण्यात आलं . तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी रावल कुटुंबीयांनी दिलेला धनुष्यबाण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच असेल असं सूचक विधान केलंय .
धनुष्यबाण नेमका कोणाचा ? यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल, दोन्ही दावे पोहचलेत . मात्र आम्हाला विश्वास आहे सर्वाधिक लोकप्रतिनिधी शिंदेंकडे , सर्वाधिक पदाधिकारी ,कार्यकर्ते शिंदेंकडे आहेत. त्यामुळे रावल कुटुंबीयांनी सत्कार समयी दिलेलं धनुष्यबाण देखील शिंदेंकडे देईल , धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच येईल असं सूचक विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी ही अग्रीम शुभेच्छा समजतो असं विधान करून उद्धव ठाकरेंना सूचक इशाराच दिलाय. अर्थात निवडणूक आयोग हे पूर्ण स्वायत्त असल्यानं अपेक्षा व्यक्त करतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी बाजू भक्कमपणे मांडली जाईल निर्णय त्यांना म्हणजे निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच धन्युष्यबाण येईल असं चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी दोंडाईचा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात दादासाहेब रावल उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ग्लुकोज फार्मास्युटिकल नवीन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा, स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कृषी महाविद्यालय इमारत व बहुउद्देशीय संकुल इमारतीचे उदघाटन, छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल यांच्या स्मारकास अभिवादन, लोकनेते सरकारसाहेब रावल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सहकार महर्षि दादासाहेब रावल सहकारी सूतगिरणीचा ई भूमीपुजन शुभारंभ, ७५ हजार रोपे वाटपाचा कार्यक्रम, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ फूट उंच असलेल्या ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा यानिमित्त दादासाहेब रावल क्रीडा संकुलात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास तसेच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य :-
नार -पार -गिरणा प्रकल्प चा कार्यक्रम आपल्याच काळात हाती घेऊन पूर्ण करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं . विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प पूर्णकरण्यास प्राधान्य असेल. या ठिकाणचे प्रकल्प जोपर्यंत आपण पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत आपण शेतीला पाणी देऊ शकणार नाही . नद्या दिसताहेत , प्रकल्पही झाले आहेत , पाणी तर जबरदस्त दिसतंय , अनेकवेळा बारमाही पाणी दिसतंय , मात्र ते शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहचलं पाहिजे . जलयुक्त शिवारमुळे शेतीला फायदा झालाय . बागायती क्षेत्र वाढलंय , फळबाग वाढलीय , असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महत्वाकांक्षी योजनेच्या फलित विषयी सांगितलं .
शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करणार- शेतकऱ्यांची शेतीतील उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यातील कृषी अभ्यासक्रमांत आवश्यक ते बदल करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये नवनवीन संशोधन होत आहे ते बदल विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी राज्याच्या कृषी अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक आहे. यामुळे रासायनिक खताचा वापर कमी करुन जास्तीत जास्त जैविक शेती कशी करता येईल, जैविक खताचा वापर कमीत कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल अशा अनेक गोष्टी कृषी महाविद्यालयात शिकवता येतील त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार कृषी अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सिंचनाच्या क्षेत्रात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील सिंचनाचे प्रकल्प येत्या काळात पूर्ण करणार असून नदी नाल्यातील पाणी जमिनीत अडवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. धुळे, नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला सुधारित मान्यता देऊन सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रास चालना देण्यासाठी यावर्षांपासून चेतक फेस्टीवलचे आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं .
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा