कृषि विज्ञान केंद्र,धुळे प्रक्षेत्रावर ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न........
महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय धुळे, कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि सिंजेटा इंडीया प्रा.ली. यांचे संयुक्त विद्यमाने ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र धुळे प्रक्षेत्रावर संपन्न. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी.डॉ. चिंतामणी देवकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, धुळे हे होते तसेच व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये शांताराम मालपुरे, उपविभागीय कृषी अधिकारी, धुळे, डॉ.दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, धुळे ,तुकाराम औटी,विभागीय विक्री प्रमुख, सिंजेटा, धुळे, कृषी महाविद्यालायचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ, कृषी तंत्र विद्यालाचे कर्मचारी, अधिकारी कर्मचारी सिंजेटा, धुळे, तसेच धुळे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते.
आमच्या सर्व ताज्या बातम्यांच्या अपडेट साठी आताच आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा