मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक, औरंगाबाद जिल्हा दौरा....

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक, औरंगाबाद जिल्हा दौरा....

राष्ट्रीय,city,मुख्यमंत्री-एकनाथ-शिंदे,



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांकरिता नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत.


शुक्रवार दि.29 जुलै रोजी सोयीनुसार मालेगाव (जि.नाशिक) कडे प्रयाण आणि मालेगाव येथे मुक्काम. शनिवार दि.30 जुलै रोजी मालेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांबाबत आढावा बैठक होईल. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना होणार असून तेथे त्यांचा मुक्काम असणार आहे.


रविवार दि.31 जुलै रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होईल. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन, भूमिपूजन आदी कार्यक्रम होतील. त्यानंतर मुख्यमंत्री सोयीनुसार मुंबईकडे रवाना होतील.

आमच्या सर्व ताज्या बातम्यांच्या अपडेट साठी आताच आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा !

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

टिप्पण्या