आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामाचं फागण्यात उदघाटन...

आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामाचं फागण्यात उदघाटन...

city,धुळे,आमदार-कुणाल-पाटील,




धुळे :-   सुरत-नागपूर महामार्गावरील फागणे  गावात धुळे ग्रामीण चे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं.यात जलवाहिनी , भूमिगत गटारी, घन कचरा व्यवस्थापन, तसेच पुलाच्या बांधकामाचा समावेश आहे.

जलवाहिनीच्या कामासाठी १ कोटी ९८लाख,भूमिगत गटारी, घन कचरा व्यवस्थापन साठी ८६लाखाचा निधीचा समावेश आहे. त्याच प्रमाणे पुलाच्या बांधकामासाठी  साधारण १कोटी २५ लाख रुपये  निधी आमदार निधीतून मंजूर झाला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते फीत कापून, नारळ फोडून विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. 
फागणे ग्रामपंचायत सरपंच कैलास पाटील ,उपसरपंच तृप्ती राकेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांनी आमदार कुणाल पाटील यांचे यथोचित स्वागत केले.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. फागणे गावाच्या जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी सदैव  प्रयत्नशील राहील. असं आश्वासन आमदार कुणाल पाटील यांनी ग्रामस्थांना दिले.

 अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

टिप्पण्या