नियोजित धुळे ते नरडाणा रेल्वे मार्गासाठीभूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापनेची कार्यवाही सुरूसहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहिती
नियोजित धुळे ते नरडाणा रेल्वे मार्गासाठीभूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापनेची कार्यवाही सुरूसहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहिती
धुळे,
नियोजित धुळे (बोरविहीर) ते नरडाणा नवीन रेल्वे मार्गासाठी धुळे तालुक्यातील नरव्हाळ, गाडउतार, सावळदे, सौंदाणे, पिंप्री, वडजाई, बाळापूर, वरखेडे, निमखेडी, कुंडाणे (वरखेडे), बिलाडी, न्याहळोद, धमाणे, कापडणे, सरवड, लोणकुटे, दापुरा, सोनगीर येथील खासगी जमिनी संपादनासाठी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे यांच्याकडून भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही सुरू झालेली आहे, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी म्हटले आहे, रेल्वे मंत्रालय (मध्य रेल्वे) यांच्याकडील 22 फेब्रुवारी 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार भारतीय रेल्वेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मुदतीत व पारदर्शीपणे तसेच जलद गतीने व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया ही रेल्वे अधिनियमान्वये विशेष रेल परियोजना म्हणून अधिसूचित करण्यात आली आहे. या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनासाठी भूसंपादन, पुनर्वसन, व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार सुरू असलेली कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी 20 मे 2022 रोजीच्या पत्रान्वये रद्द केलेली आहे.
तसेच रेल्वे मंत्रालय (मध्य रेल्वे) यांच्या 25 मार्च 2022 रोजीच्या अधिसूचनेन्वये विशेष रेल परियोजनेचे रेल्वे अधिनियमामधील तरतुदीनुसार कार्यवाहीसाठी धुळे तालुक्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे भाग, धुळे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने रेल्वे अधिनियमामधील तरतुदीनुसार भूसंपादनाबाबत कार्यवाही सुरू करून भारत सरकार राजपत्रामध्ये 20 (अ) ची अधिसूचना 20 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडील राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेची प्रत उपविभागीय अधिकारी कार्यालय, धुळे, तहसील कार्यालय, धुळे व संबंधित गावातील गावचावडीवर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, भूसंपादनाचा मोबदला हा भूसंपादन अधिनियम 2013 च्या कायद्यानुसार अदा करण्यात येईल.
यापूर्वी जिल्ह्यात अन्य भूसंपादन प्रक्रिया पार पाडताना वेळोवेळी निदर्शनास आलेल्या गैरकृत्यांना आळा बसण्यासाठी संभावित भूसंपादन क्षेत्राचे हस्तांतरण व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच रेल्वे मार्गासाठी भूसंपादन होणाऱ्या क्षेत्राचा संबंधितांना नियमानुसार योग्य मोबदला मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संभावित क्षेत्राचे ड्रोन सर्वेद्वारे परीक्षण करून जमिनीच्या सॅटेलाइट इमेजेस देखील घेण्यात आलेल्या आहेत. तसेच संबंधित क्षेत्राचे सद्य:स्थितीचे तलाठी, मंडळाधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्यात आले आहेत.
त्यामुळे जमीनधारकांनी भूसंपादन होणाऱ्या जमिनीच्या, फळझाडांच्या नुकसानीचा जास्त अवाजवी मोबदला मिळवून देण्याच्या कोणत्याही अमिषाला बळी पडू नये व खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून कोणत्याही व्यक्तीसोबत नोटरी, सौदा पावती, प्रतिज्ञापत्र करण्यात येवू नये तसेच अधिसूचनेत नमूद गट क्रमांकाचे पोटहिस्से झालेले नसल्यास जमीनधारकांनी पोटहिश्याची मोजणी स्व-खर्चाने करून घ्यावी. ज्यामुळे संपादित होणाऱ्या क्षेत्राचा मोबदला योग्य धारकास मिळण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत, असेही सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी म्हटले आहे.
BREAKING NEWS,marathi news,Breaking News In Marathi,marathi batmya,live marathi sampadak,news flash,News,short news,latest-marathi news,latest marathi batmya,
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा
marathi sampadak,marathi sampadak live,marathi sampadak media,marathi sampadak news,marathi news,live marathi sampadak,marathi sampadak media blog,marathi sampadak media live,marathi sampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा