एसटी च्या देखभाल दुरुस्ती विभागालाच "दुरुस्ती"ची आवशकता.
एसटी ची देखभाल, दुरुस्ती बाबत एसटी प्रशासन किती गंभीर आहे ?असा सवाल एसटीचे हे फोटो बघितल्यानंतर उपस्थित होत आहे.
कोपरंगाव डेपोची एमएच -बीटी- ३४३९ क्रमांकाची बस चा पुढील तुटलेला बंपर दुरुस्त करण्यास बहुदा देखभाल, दुरुस्ती विभागाला वेळ नसावा.वाटेत काही अनिष्ट घडू नये.म्हणून चालकानं हे तुटलेल्या बंपरला दोरी बांधली. ज्या विभागाची जी ड्युटी आहे ती ड्युटी तेथील अधिकारी, कर्मचारी किती प्रामाणिकपणे करीत आहे याची पडताळणी एसटी च्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन करायला हवी.
चोपडा डेपोची बस क्रमांक एम एच -२०-बीएल-१६३७क्रमांकाच्या बसच्या इंजिन च्या जाळी दरवाज्याला लॉक सिस्टीम नसल्यानं ते एका दोरीनं बांधण्यात आलं. हे दोन प्रातिनिधिक स्वरूपातील झालं.राज्यातील प्रत्येक आगारात काय स्थिती असेल ते समजण्यासाठी हे फोटो पुरेसे बोलके आहेत.
आता हेच पहायचे आहे की, एसटी प्रशासन देखभाल दुरुस्ती विभागाला काय " डोस " देतं. पावसाळा काही दिवसांवर आलाय गळक्या बस, तावदाने तुटलेल्या बस , बस चे छत गळणार नाही म्हणून काही उपाय योजना करण्यात येणार आहेत की नाही?की नेहमीच येतो पावसाळा..या उक्तीप्रमाणे वेळ निभावून नेली जाणार.?असा सवाल एसटीच्या सुज्ञ प्रवाशांनी व्यक्त केलाय .
BREAKING NEWS,marathi news,Breaking News In Marathi,marathi batmya,live marathi sampadak,news flash,News,short news,latest-marathi news,latest marathi batmya,ST Bus , MSRTC , News,
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा
marathi sampadak,marathi sampadak live,marathi sampadak media,marathi sampadak news,marathi news,live marathi sampadak,marathi sampadak media blog,marathi sampadak media live,marathi sampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा