महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेल चे दर कमी होणार..? राज्य सरकार इंधनावर लावण्यात येणारा व्हॅट कमी करेल का ?

महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेल चे दर कमी होणार..? राज्य सरकार इंधनावर लावण्यात येणारा व्हॅट कमी करेल का ?

BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news,petrol Diesel,Fuel Prices ,


गेल्या काही दिवसांत सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहे.. त्यावरुन विरोधक नेहमीच मोदी सरकारवर टीका करताना दिसतात.. या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत बुधवारी (ता. 27) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला..


मोदी सरकारने 6 महिन्यांपूर्वी इंधनावरील ‘व्हॅट’ कमी केला, नंतर भाजपशासीत राज्यांनीही त्यांच्या करात कपात केल्याने तेथे पेट्रोल-डिझेलच्या किमती बऱ्याच कमी झाल्या. मात्र, महाराष्ट्र सरकारने त्यावेळी करात कपात केलेली नव्हती. हाच मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला.. तसेच राज्य सरकारने इंधनावरील ‘व्हॅट’ कमी करावा, अशी सूचना केली


मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले.. मात्र, माेदी यांच्या आवाहनानंतर आता ठाकरे सरकार पेट्रोलच्या दरात 1 रुपया कपात करण्याच्या विचारात आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज (ता. 28) बैठक होत असून, त्यात हा प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे समजते..


पेट्रोल बरोबरच डिझेलचे दरही 1 रुपयांनी कमी करता येतील का, यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव या बैठकीत मांडला जाणार असल्याचे समजते. पंतप्रधान मोदी यांनी कान टोचल्यावर इंधनाचे दर कमी करण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे बोलले जाते..

petrol Diesel,Fuel Prices ,BREAKING NEWS,marathi news,Breaking News In Marathi,marathi batmya,live marathi sampadak,news flash,News,short news,latest-marathi news,latest marathi batmya,

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

marathi sampadak,marathi sampadak live,marathi sampadak media,marathi sampadak news,marathi news,live marathi sampadak,marathi sampadak media blog,marathi sampadak media live,marathi sampadak

टिप्पण्या