एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्च ची डेडलाईन !!

  एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्च ची डेडलाईन  !! 

BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news,st-strike,msrtc-strike,st-samp,st-strike-update,


एसटी कर्मचाऱ्यांना ३१ ची डेडलाइन असे सूतोवाच परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत केले .  मुंबई , ता . २५ : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आज राज्य सरकारने अंतिम निर्वाणीचा इशारा दिला आहे . कामावर ३१ मार्च पर्यंत रूजू व्हा , अन्यथा कठोर कारवाईचा पर्याय सरकारला नाईलाजाने निवडावा लागेल . एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सरकारने मान्य केला असून या समितीनेच एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला असल्याचे परब यांनी स्पष्ट केले . संपकरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेहून अधिक वेतनवाढ आणि इतर सुविधा दिल्या आहेत . मात्र विलिनीकरणाचा विचित्र हट्टीपणा करत अनेक कामगार संपावर कायम आहेत . त्या सर्व संपकऱ्यांनी ३१ मार्च पर्यंत कामावर रूजू व्हावे . ही अंतिम संधी सरकार देत असल्याचे परब यांनी स्पष्ट केले . दरम्यान , विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची विनंती केली . जर हे कर्मचारी संपावर कायम राहिले तर खासगीकरण न करता भाडेतत्वावर बस घेवून राज्यातील जनतेला सेवा पुरवली जाईल असे त्यांनी सांगितले . यामध्ये खासगी बसचा पहिला पर्याय असून त्यानंतर एसटी महामंडळ तीन हजार बस खरेदी करणार आहे .

BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news,st-strike,msrtc-strike,st-samp,st-strike-update,

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews

टिप्पण्या