धुळे शहरासाठी महत्वाची ठरणारी अक्कलपाडा पाईपलाईन योजना दिवाळीपर्यंत पूर्ण करा. - खासदार डॉ. सुभाष भामरेंचे यंत्रणेला निर्देश .

 धुळे शहरासाठी  महत्वाची ठरणारी अक्कलपाडा पाईपलाईन योजना दिवाळीपर्यंत पूर्ण करा. - खासदार डॉ. सुभाष भामरेंचे यंत्रणेला निर्देश . 

धुळे, 

धुळे शहरासाठी महत्वाची ठरणारी अक्कलपाडा पाईपलाईन योजना दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी या योजनेच्या कामाच्या पाहणी प्रसंगी अधिकाऱ्यांना दिलेत.  

अमृत योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या निधीतून अक्कलपाडा धरणातील उद्भव विहिरीपासुन ते धुळे शहरातील संतुलीत जलकुंभापावेतो टाकावयाच्या गुरुत्व पाईपलाईनच्या कामाबाबत धुळे लोकसभेचे खासदार सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, स्थायी समितीचे सभापती शितल नवले तसेच पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवनप्राधीकरण विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण विभाग तसेच महानगर पालिकेचे अधिकारी यांचे समवेत अक्कलपाडा धरण येथे पाईपलाईन कामाची  पाहणी केली. 

 या कामात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. अमृतयोजने अंतर्गत केंद्र शासनाच्या निधीतुन अक्कलपाडा ते धुळे शहरातील जलकुंभापावेतो टाकावयाच्या गुरुत्व पाईपलाईनच्या कामाबाबत चर्चा विनीमय करून निर्णय घेणेकामी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर योजनेचे भुमीपुजन भारताचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. सद्यस्थितीत सदर योजनेचे काम सुमारे ८०टक्के पुर्ण झाले असुन योजना विहित मुदतीत पुर्ण करावयाची असल्याने अक्कलपाडा धरणात उद्भवाचे कामापासुन जवळच असलेल्या ब्रिजपावेतो धरणाच्या उच्चतम पातळीचे वरउध्दरण नलिकाचे पाईपलाईन टाकणेसाठी परवानगी बाबत तसेच १२०० मिमी व्यासाची गुरुत्वनलिका ही कॅन क्रॉसिंगसाठी परवानगी बाबत पाटबंधारे विभागाच्या संबंधीत अधिकारी यांचेशी चर्चा करुन याबाबत निर्णय होऊन  कामाची परवानगी देण्यात आली.तसेच उदभरण नलिका ते जॅकवेल ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत धरणाजवळ असलेला डोंगर फोडुन रस्ता व पाईपलाईनसाठी जागा तयार करणे तसेच जलशुध्दीकरण केंद्र ते धुळे शहरातील संतुलित जलकुंभापर्यंत  टाकावयाच्या गुरुत्व नलिका  ९ ठिकाणी जवळपास ४० शेतकऱ्यांनी कमी मोबदल्याबाबत काम बंद पाडण्यात आलेले होते. याबाबत देखील राष्ट्रीय महामार्गाच्यासंबंधीत अधिकाऱ्यांशी जागेवर चर्चा करुन याबाबत निर्णय घेण्यात आला.  या कामात यापुढे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही व या योजनेतून किमान दिवाळीपर्यंत पाणी धुळे शहरापर्यंत पोहोचविणेबाबत आदेश खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. सदर कामाच्या पाहणी प्रसंगी  खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, स्थायी समितीचे सभापती शितल नवले, माजी महापौर चंद्रकांत सोनार तसेच पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण विभाग तसेच महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

   BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news,

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews

टिप्पण्या