लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी मार्गदर्शन करावे - मंत्री अमित देशमुख

 लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी मार्गदर्शन करावे - मंत्री अमित देशमुख

लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी मार्गदर्शन करावे - मंत्री अमित देशमुख


            मुंबईदि. 25 : लता मंगेशकर यांचे गायन आणि त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्वच अलौकिक असे होते. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक राज्य शासनातर्फे उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी मार्गदर्शन करावेअशी विनंती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली. सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी मंगेशकर कुटुंबियांची घरी जाऊन सांत्वना भेट घेतलीत्यावेळी ते बोलत होते. लता दीदींच्या धाकट्या भगिनी उषा मंगेशकर आणि बंधू हृदयनाथ मंगेशकरमाजी आमदार उल्हासदादा पवारसंगीतकार मयुरेश पै यावेळी उपस्थित होते.

            सुमारे 40 वर्षांपूर्वी लातूरमध्ये प्रथमच एका महाविद्यालयाला मा. दीनानाथ मंगेशकर यांचे नाव  देण्याची लातूरकरांची विनंती  दीदींनी मान्य केली होतीअशी आठवण सांगत श्री.देशमुख  यांनी  लता दीदींच्या लातूरशी निगडित आठवणी जागवल्या. दिवंगत विलासराव देशमुख आणि दीदींना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या जिव्हाळ्याबद्दलच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

            लता दीदींच्या कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी उत्कृष्ट असे संगीत संग्रहालय शासनाला उभारता येईलअसे सांगून श्री. देशमुख यांनी याबाबत मंगेशकर कुटुंबियांचा मानस जाणून घेतला. याबाबतच्या सूचना कुटुंबियांकडून शासनाला पत्राद्वारे कळविण्यात येतीलअसे हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी सांगितले.

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews

टिप्पण्या