इव्हिनिंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशात फिरणार पोलिस...
धुळे,
धुळे शहरातील शिवाजी रोड, पांझरा नदी काठचा परिसर, वीर सावरकर पुतळा, हत्ती डोह, वाडीभोकर रोड, गोंदूर विमानतळ, कृष्णाई हॉटेल व हनुमान टेकडी परिसर तसेच विरळ वाहतूक असलेल्या रस्त्यांवर सायंकाळी ज्येष्ठ नागरिक व महिला इव्हिनिंग वॉक (शतपावली) करण्यासाठी येतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, त्यांच्या जीवितास धोका निर्माण होवू नये, अशा घटनांना प्रतिबंध व्हावा म्हणून पोलिस अधिकारी व कर्मचारी साध्या वेशात गस्त घालणार आहेत. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले असल्याचं जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात नमूद केलंय.
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा