सानुग्रह अनुदान नामंजूर झालेल्या अर्जावर जीआरसीकडे अपील करावे
Dhule धुळे,
‘कोविड- 19’मुळे मृत झालेल्या रुग्णांच्या निकटच्या नातेवाईकास सानुग्रह साहाय्य वितरीत करण्यासाठी mahacovid19relief.in या पोर्टलवर सानुग्रह साहाय्य प्राप्त होण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात येत आहेत. मात्र, विविध कारणांमुळे ज्यांचे अर्ज फेटाळले गेले असल्यास शासनाच्या वरील संकेतस्थळावर अर्जदारास appeal to GRC असा संदेश दिसेल. अशा अर्जदारास त्याचा अर्ज योग्य आणि विश्वसनीय आहे, असे वाटत असल्यास प्रकरणाच्या फेर तपासणीकरीता अर्जदाराने याच संकेतस्थळावर जावून appeal to GRC या संदेशावर क्लिक करून GRC कडे अपील करावे. त्यानंतर अर्जदाराने Online GRC कडे संदेश पोर्टलवर सादर झाल्याचे दिसेल. यानंतरच्या पुढील कार्यवाहीसाठी शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील त्यानुसार अनुपालन करण्याची तरतूद ठेवली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा