मंत्री अनिल परब साहेब जरा हे देखील जाणून घ्या....

 मंत्री अनिल परब साहेब जरा हे देखील जाणून घ्या....

ST-STRIKE-UPDATE,ststrike,MSRTC-WOKER-STRIKE,MSRTCNEWS,MSRTCNEWSUPDATE,MSRTC-WOKER-STRIKE-UPDATES,MSRTC
मंत्री अनिल परब साहेब जरा हे देखील जाणून घ्या....



गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा सुरू आहे.या दुखवट्यात सहभागी असल्याच्या कारणावरून एसटी प्रशासनाने तोंड पाहून आकस बुद्धीने एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ ची कारवाई केलीय.तर काही कर्मचाऱ्यांना केवळ प्रोसिजर म्हणून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.जे कर्मचारी आपली ड्युटी इमाने-इतबारे करत होते अश्याच कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ ची कारवाई झालीय हे मंत्री अनिल परब साहेबाना माहिती आहे का?

ST-STRIKE-UPDATE,ststrike,MSRTC-WOKER-STRIKE,MSRTCNEWS,MSRTCNEWSUPDATE,MSRTC-WOKER-STRIKE-UPDATES,MSRTC

निलंबीत, बडतर्फ कर्मचाऱ्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात क्लार्क कडे सादर करायला लावणे, कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेणे हे कुठल्या कायद्यात बसतं. 

ST-STRIKE-UPDATE,ststrike,MSRTC-WOKER-STRIKE,MSRTCNEWS,MSRTCNEWSUPDATE,MSRTC-WOKER-STRIKE-UPDATES,MSRTC

सध्या प्रत्येक आगारात आपण बॅनर लावले आहे त्यात स्पष्ट उल्लेख आहे की ज्या कर्मचाऱ्यांवर कुठलीच कारवाई झाली नाही असे कर्मचारी कामावर पुन्हा हजर झाल्यास त्यांच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही.ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच नाही त्यांच्यावर कारवाई होणार नाही हे हास्यास्पद आहे.मात्र ज्यांच्यावर निलंबन, बडतर्फ ची कारवाई झाली आहे.असे बहुतांश कर्मचारी कामावर पुन्हा हजर होण्यास तयार आहेत.अश्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण,प्रशासन, शासन  कुठलीच कारवाई करणार नाही असं लिखीत स्वरूपात जाहीर का करत नाही.ज्यांच्यावर कारवाई झाली नाही असे कर्मचारी कामावर पुन्हा हजर झाल्यास त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाही याचाच अर्थ या कर्मचाऱ्यांवर जाणूनबुजून कारवाई झाली आहे ,तोंड बघून कारवाई करण्यात आलीय.. अश्या स्वरूपाच्या आरोपाला प्रशासन एकप्रकारे पुष्टी च देत असल्याची कर्मचाऱ्यांची धारणा झालीय. 

ST-STRIKE-UPDATE,ststrike,MSRTC-WOKER-STRIKE,MSRTCNEWS,MSRTCNEWSUPDATE,MSRTC-WOKER-STRIKE-UPDATES,MSRTC

मंत्री अनिल परब साहेब एकदा जरा कर्मचाऱ्यांचे म्हणणे जाणून घ्या.तुमच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यापेक्षा कर्मचाऱ्यांचे म्हणणे जाणून घ्या.निलंबीत, बडतर्फ कर्मचाऱ्यांवर कुठलीच कारवाई होणार नाही असं लेखी जाहीर करा.याचा नक्कीच होणारा  परिणाम सकारात्मक असेल.मात्र त्यासाठी इच्छाशक्ती हवी.कोणतंही राजकारण नसावं, माणुसकी असावी ....बघा जमतं का?मंत्री अनिल परब साहेब जेवढं तुम्ही प्रवाश्यांच्या आस्थेपायी बोलता आहात त्याच आस्थेला जागून जरा हा सुद्धा एक प्रयत्न करून बघा...

- एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एक सदस्य...


अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews

टिप्पण्या