Viral video कार रस्त्यावरून थेट क्रीडा संकुलाच्या तळमजल्यात....
car-accident,accidentvideo,maharashtracaraccident,accidentvideo,
धुळे शहराजवळील गोंदूररोडला लागून जिल्हा क्रीडा संकुल आहे. शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे रस्त्यावर गर्दी तर क्रीडा संकुलातील दुकाने सुरू होती. याचवेळी भरधाव वेगात वाहन जात होते तर समोरून कारही आली. या वाहनाला चुकवताना कार चालकाचे नियत्रंण सुटले. त्यानंतर ही कार मुख्य रस्त्यावरून थेट तळमजल्यावर एका खाद्यपदार्थाच्या दुकानापुढे जाऊन आदळली. याठिकणी दोन मुले बाहेर खाद्यपदार्थ घेत होते. तर दुकानातही तुरळक गर्दी होती. कार खाली दोन्ही मुले दाबली गेली. तर अपघातामुळे मोठा आवाज झाला. हा प्रकार लक्षात येताच नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी जखमींना बाहेर काढले. या अपघातात नऊ वर्षीय प्रशांत वाघ सात वर्षीय समीर पिंजारी या दोन मुलांसह श्याम भगवान चौधरी, अन्नपूर्णा भगवान चौधरी, लक्ष्मण फकिरा बोरसे, हिराबाई बोरसे हेही जखमी झाल्यानं त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं सांगण्यात आलं . घडलेल्या घटनेविषयी काही नागरिकांनी पोलिसांना माहिती कळवताच काही वेळातच पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं . घटनास्थळापासून काही अंतरावर गतीरोधक आहे. या गतीरोधकामुळे कार काही अंशी नियंत्रणात आली. अन्यथा कार थेट दुकानात जाऊन पडली असती. यामुळे मोठा अनर्थ घडला असता अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा