विद्यार्थिनींचा आवाज तरी मंत्र्यांना ऐकू येईल का ?

 राज्यकर्त्यांनो ऐका..

विद्यार्थीनी काय म्हणताहेत ....!



https://youtu.be/iRmY9CXMhn0

राज्यात गेल्या २७ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं ग्रामीण भागातील जनजीवनावर, आठवडी बाजारावर याचा परिणाम दिसून येत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची गैरसोय झालीय.एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी , आतापर्यंत ४२एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या संदर्भात राज्य सरकारने किमान संवेदना व्यक्त करण्यासाठी काही ठिकाणी विद्यार्थिनींनी हातात फलक घेऊन आंदोलन केले. तर काही ठिकाणी निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.एसटी कर्मचाऱ्यांच्या या दुखवट्यात प्रत्येक जण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत सहभागी होत आहे.सध्या सोशल मीडियावर शाळकरी विद्यार्थिनींनी सोनू तुला माझ्यावर भरोसा नाहीय का ?या गीताच्या चालीवर आपल्या पद्धतीने परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय....काश या विद्यार्थिनींची तळमळ तरी मंत्री महोदयांना समजेल अशी आशा आहे... काय आहे हा व्हिडीओ पाहुयात ...  विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा !!  watch full video

ब्युरो रिपोर्ट 
मराठी संपादक.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा