एसटी संपाला ग्रामस्थांचा पाठिंबा
एसटी संपाला विविध संघटनांकडून पाठींबा
ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेल्या एसटी चं राज्य शासनात विलनीकरण करावं , या मागणीसाठी गेल्या २६दिवसांपासून राज्यातील विविध एसटी आगारातील कर्मचारी संपावर आहेत.कर्मचाऱ्यांचा संप फोडण्यासाठी राज्यकर्ते, प्रशासन वेगवेगळे फंडे अवलंबत आहेत, मात्र संपकरी कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम असल्यानं राज्य सरकारची डोकेदुखी वाढलीय.
एसटीच्या संपाला विविध सामाजिक राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळतोय.प्रवाशी देखील पाठिंबा देत आहेत. इतकंच नाही तर ग्रामस्थ देखील पाठिंबा देत आहे. जे ग्रामस्थांना कळतंय , समजतंय ते राज्यकर्त्यांना कळू नये?राज्यकर्ते काही समजत नसल्याचा आव आणून वेळ तर निभावून नेत नाही ना?अशी प्रतिक्रिया हा व्हिडीओ बघितल्यानंतर व्यक्त होत आहे.
ब्युरो रिपोर्ट
मराठी संपादक.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा